श्रमिकांचा सिनेमा

अमोल उदगीरकर हल्ली सर्वत्र काही विशिष्ट भित्तिपत्रके लक्ष वेधून घेतात. भोजपुरी नट-नट्यांचे स्टेज शो सध्या ठिकठिकाणी जोरात आहेत. जरा खोलात जाऊन चौकशी केली, तर असं आढळून आलं की या कार्यक्रमांना तुफान गर्दी लोटत असते. तिकिटांचे रेट सर्वसामान्य श्रमिक कामगारांना परवडतील असेच असतात. या कार्यक्रमांना स्थलांतरित उत्तर भारतीय श्रमिक वर्ग हजेरी लावतात. या श्रमिकांच्या सिनेमाच्या अंतरंगात डोकावताना दिसलेले अनेक पैलू… ************************************************************************************************************* भोजपुरी चित्रपटसृष्टी पूर्व उत्तर प्रदेश, पश्‍चिम बिहार आणि दक्षिण नेपाळ या भौगोलिक प्रदेशांत भोजपुरी भाषा बोलली जाते. त्याशिवाय भोजपुरी भाषिक […]

मृगजळ

लक्ष्मीकांत देशमुख त्या मध्यरात्री त्यांच्या घरात चार बुरखा घातलेले नक्षली शिरले होते. एकानं मोठ्यानं ‘चंद्राण्णा’ अशी हाक मारत लाथेनं दोघांच्या अंगावरचं पांघरूण काढलं व टॉर्चचा प्रकाशझोत टाकीत तो चंद्राण्णाच असल्याची खात्री करून घेत त्याच्यावर रायफलनं चार गोळ्या घातल्या. त्याच्या मर्मांतक विव्हळण्यानं व सुखदाईच्या ओरडण्यानं खुशी जागी झाली व तिनं भोकाड पसरलं. तिच्या तोंडावर हात ठेवीत तिला सुखदाईनं गप्प करत छातीशी धरलं… ************************************************************************************************************* ‘पोलिस अधिकार्‍याचा खून करून सुखदाईचं जंगलात पलायन. मांगी या नक्षली दलममध्ये पुन्हा सामील – सूत्रांची माहिती.’ दंडकारण्यातील घनदाट […]

त्या दोघी आणि त्यांचे वडील

डॉ. सुबोध नाईक ह्या कथेमधले विज्ञानतज्ज्ञ वडील आपल्याला भेटतात ते दररोज आपल्या स्वयंपाकघरात आणि विज्ञान, कला, संशोधन, संस्कृती अशा बर्‍याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ अशा ह्या दोन मुलींच्या आयुष्याचे शिल्पकार म्हणून! आणि ह्या दोन मुलीही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात तर भेटतातच. पण, आपल्या जीवनाच्या बाकीच्या बर्‍याचशा महत्त्वाच्या अंगांमध्येही! ‘मी करत असलेल्या कोणत्याही गोष्टीने भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता त्याचा फायदाच होतो आहे ना,’ असा प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक क्षणाला विचार करणार्‍या ह्या दोन मुलींची आणि त्यांच्या तशाच तेजस्वी वडिलांची ही ओळख. ************************************************************************************************************ […]

वसंतदादा पाटील : लोकोत्तर लोकनेता

दिनकर रायकर इतका मोठा माणूस, पण राहणी अतिशय साधी. ब्रॅण्डेड कपडे, गाड्या, दागिने याच्या आहारी गेलेल्या राजकारण्यांपेक्षा एकदम वेगळं व्यक्तिमत्त्व! सत्तेची खुर्ची असतानाही दादांमधला सहृदय माणूस कायम जागा होता. त्यांचा पिंड जुन्या पठडीतल्या माणसांसारखा. स्वत:च्या हिमतीवर, स्वकर्तृत्वावर त्यांची राजकीय कारकिर्द घडली. दादांना कधी ‘गॉडफादर’ची गरज भासली नाही. दादांचा सर्वांत मोठा गुण असा की, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचं दडपण जनसामान्यांवर कधीही येऊ दिलं नाही. ************************************************************************************************************ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काया-वाचा-मनाने झोकून देणार्‍या आणि कालांतराने भारत स्वतंत्र होण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर नव्या भारताच्या जडणघडणीला […]

तांडव

अनंत खासबारदार बाहेरच्या सृष्टीचाच धीर जणू सुटला होता. धीरानं-नेटानं आजवर उभी राहिलेली झाडं… या तांडवात कस्पटासारखी! उन्मळून-विखरून… विचित्र आवाजात तुटणारे त्यांचे बुंधे… त्यांचा आवाज त्यातच विरून जाणारे आणि चित्कार, पक्षांचे त्यानं गिळलेल्या सगळ्यांच्याच घुसमटीचे, तडफडीचे आवाज. आणि एक कुंद वास पसरून राहिलेला… ************************************************************************************************************* शिवलीलामृताची पोथी कपाटात ठेवून माई वळाली…. मघाशीच दिवा अचानक शांत झाला होता. पोथीतल्या टाईपवरून नजर फिरतानाच, मघाशीच त्यांना मंद वाटलं. ते त्यामुळचं! वर्षानुवर्षे पाठ असणारं शिवलीलामृत! पण समोर जीर्ण पानं असली की सवयीला दिलेला तो एक नमस्कारच […]

ग्रेट भेट : मंतरलेले दिवस

राम जगताप ज्याच्या घरी लहानपणी दारिद्य्रामुळे टीव्ही नव्हता आणि आता विशिष्ट वैचारिक भूमिकेमुळे नाही असा माणूस ध्यानीमनी नसताना न्यूज चॅनेलमध्ये जातो आणि तिथे काय काय शिकतो, कुठले कुठले गमतीशीर अनुभव घेतो; निळू फुले, लालन सारंग, पाडगावकर, अमरापूरकर, प्रभावळकर, मुणगेकर यांच्या वेगळेपणाचे कोणकोणते पैलू टिपतो या विषयीचा लेख… ************************************************************************************************************* गरिबीमुळे एकेकाळी आमच्या घरात टीव्ही नव्हता. मराठवाड्यातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेडेगावात आम्ही राहत होतो. आई-वडील शेतमजूर होते. आम्हा तिघा भावांना शाळेला सुट्टी असेल तेव्हा शेतमजुरी करावी लागे. बारावीनंतर पुण्यात शिकायला आलो. 1999 […]

ललितबंध

जयंत विद्वांस स्वर आणि सूर जुळून आले की जगण्याचीच एक अविट मैफल रंगते. समृद्ध करणारे हे ललितबंध मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्‍न पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा. ************************************************************************************************************* म्हणून मलापण दिसतं! दहाची एस.टी. धापा टाकल्यासारखी पुलाच्या अलीकडच्या चढावर थांबली आणि पटकन उतरलो. […]

बायॉनिक्स: सजिवांचे तंत्रज्ञान

प्रदीपकुमार माने मानव निसर्गाचेच अनुकरण करीत आहे. मानवानं केलेल्या प्राथमिक तंत्रज्ञानाची निर्मिती निसर्गाचं अनुकरण करूनच केलीय. सर्वांत पहिलं तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणार्‍या दगडांचंं हत्यारातं रूपांतर करणांर्‍या तंत्रज्ञानात प्राण्यांच्या सुळेदार दातावरूनच नक्कल करण्यात आलीय. अशा प्रकारे निसर्गापासून प्रेरणा घेऊन निर्माण झालेल्या तंत्रज्ञानास बायॉनिक्स असे म्हणतात. ************************************************************************************************************* अकबर बिरबलच्या कथा आपणा सर्वांना माहीत असतीलच यातीलच एक कथा. अकबर बिरबरला एकदा विचारतो ‘बिरबल, निसर्गाची निर्मिती श्रेष्ठ की मानवाची निर्मिती?’ ‘राजेसाहेब मानवाची निर्मिती’ बिरबलनं उत्तर दिलं. हे दिलेलं उत्तर सिद्ध करण्यासाठी बिरबल एका शिल्पकाराला […]

जस्ट मॅरीड प्लीज एक्सक्यूज

यशोधरा लाल अनुवाद : नीता गद्रे लग्न आणि पालकत्व याविषयीचा प्रामाणिक विचार असलेली, स्वत्वाचा शोध घेणारी कथा… ************************************************************************************************************* मी विजयला विमानतळाच्या ‘आगमन थांब्या’च्या बाहेर चालत येताना पाहिलं. मी तिथं असल्याचं त्याला माहीत नव्हतं. विमानतळावरच्या प्रखर प्रकाशझोतात त्याचे केस चमकले. त्यानं लांब हाताचा टी-शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्याच्याकडे असलेल्या कपड्यांच्या तीन डिसेंट जोडांपैकी हा एक होता. तो डौलदारपणे पुढे सरकला. जवळजवळ तरंगतच. तो नेहमीच मला चाकांच्या बुटावर चालणारा जिराफ वाटतो. स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी, अगदी समर्पित होऊन गेली अनेक वर्षे […]

जोकमार : एका लोकसंस्कृतीचा शोध

चन्नवीर मठ माती आणि माता ज्यांच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे, नव्हे तर तेच त्यांचे बलस्थान आहे़ ही सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत़ सर्जनशीलता सृष्टीची असो वा शरीराची प्रवाहीच असली पाहिजे़ अशाच सर्जनशीलतेचा पुरूषी प्रतिनिधी वा रूप म्हणून जोकमार स्वामीकडे पाहता येईल़ अनेक लोकसंस्कृती आणि लोकदैवतांच्या अभ्यासकांना जोकमारस्वामी नेहमीच औत्सुक्याचे ठरले आहे़ ************************************************************************************************************* सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटला होता़ जूनमध्ये हजेरी लावून गेलेला पाऊस, पत्ता हरवलेले गाव शिवार पावसाची वाट पाहत असतांना गणेशाचे आगमन झाले़ पुन्हा दुष्काळाची धसका घेतलेल्या सर्वांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागलेले़ त्यातही […]