Author Archive

तुतुल: महाश्वेता देवी

महाश्वेता देवी प्रख्यात बंगाली लेखिका महाश्‍वेता देवी या प्रथम कार्यकर्त्या व नंतर लेखिका होत्या. भारतभरच्या आदिवासींसाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी त्यांना ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळाला होता, तर साहित्यातील कामगिरीसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ व ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ने सन्मानित झाल्या. त्यांनी मुख्यत्वे कथा व कादंबर्‍या लिहिल्या. त्या या लेखात त्यांनी आपल्या वडिलांचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यांच्यासंदर्भातील काही मजेशीर किस्सेही सांगितले आहेत. महाश्‍वेता देवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या लेखनातून त्या अमर आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन… बंगालीतून अनुवाद – विलास गीते ************************************************************************************************************* सगळे […]

एका मित्राची कथा

भारत सासणे पाटील घटना सांगताना पुन:प्रत्ययाचं दु:ख भोगत होते, तडफडत होते आणि त्यांना सांगावंसंही वाटत होतं. मला तर त्यांचं अहंकाराचं दु:ख दिसत होतं. पाटील कोणत्या तरी नरकसदृश मानसिक स्थितीत होते. त्यांच्या मुलाने हट्ट धरला, इथे संपलं नाही. शत्रूने मुलाला वश केलं. मुलगा त्यांच्या घरी जाऊ-येऊ लागला. त्यांचं ऐकू लागला, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला. वरपक्षाचा झेंडा उंच राहिला नाही. मानहानीची पाळी आली. शत्रूने मुलगी पाटलाच्या घरात दिली आणि समारंभपूर्वक पाटलांचं नाक कापलं. – भारत सासणे ************************************************************************************************************* अर्थात, पाटील हे त्यांचं […]

राऊंड द वर्ल्ड

संदीपा आणि चेतन एका मराठी तरुणाची जग प्रदक्षिणा… मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातलं एक मराठी दाम्पत्य. स्वत:चं मुंबईतील घर विकून पैसे उभे केले आणि या ध्यासापोटी चांगली नोकरीही सोडली. त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं जगप्रवासाला जायचं. मग खुणावू लागला नवा प्रदेश, नव्या वाटा, या भटकंतीतून त्यांना आलेला थरारक अनुभव, माणसं, प्रदेश, तिथल्या चालीरिती अशा असंख्य अनुभवांची ही रोमांचकारी सफर… – संदीपा आणि चेतन ************************************************************************************************************* माणूस प्रवासाला का निघतो? घरात बसून त्याचं सगळं उत्तम चाललेलं असतं की! गावात लोक ओळखत असतात, मान देत असतात. […]

चित्रांकित

प्रभाकर भाटलेकर खरोखरच आयुष्य मोठी अद्भुत गोष्ट आहे. आपल्याला ते समजलंय असे वाटत असतानाच ते गूढही वाटत असते. कलाकाराने निर्माण केलेली कला आस्वादक रसिकांपर्यंत पोहोचेपर्यंत अपूर्णच म्हणायला हवी. कलाकार आणि आस्वादक हे नातं अद्भुतच. कलाकार जातो तरी त्याची कला मागे राहते. पुढच्या पिढ्यांतील आस्वादकांसाठी. हे नातं अमर आहे. – प्रभाकर भाटलेकर ************************************************************************************************************* माणूस जन्मतो… वाढत जातो. कुठल्यातरी वळणावर स्वप्ने जमा करत जातो. पुढच्या काळात काही पुरी होतात, काही होत नाहीत… काही तुटतात. एखाद्या क्षणी आयुष्य निरखून पाहिलं तर गूढच वाटते. […]

अंतरंग एका एनआरआयचं

शिल्पा केळकर-उपाध्ये आपला देश सोडून जाणे, हा निर्णय जरी अगदी स्वखुशीने घेतला असला, तरी आपले सोडून परक्या भूमीत आपले शोधणे ह्या दिव्यातून जाताना मनाची काय अवस्था होते हे सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. खोलवर झालेले संस्कार सतत मुळाशी धाव घेत राहतात, प्रत्येक गोष्टीत कित्येक वर्षे फक्त भारतातलेच ओळखीचे संदर्भ शोधले आणि जोडले जातात. परक्या भूमीत रूजून आणि आपले भारतीयत्व जपून, तिथल्या स्थानिक लोकांना आपलेसे करू शकणार्‍या या भारतीय मनाच्या लवचिकतेची ओळख करून देणारे हे काही अनुभव आहेत आणि हेच ह्या […]

श्रमिकांचा सिनेमा

अमोल उदगीरकर हल्ली सर्वत्र काही विशिष्ट भित्तिपत्रके लक्ष वेधून घेतात. भोजपुरी नट-नट्यांचे स्टेज शो सध्या ठिकठिकाणी जोरात आहेत. जरा खोलात जाऊन चौकशी केली, तर असं आढळून आलं की या कार्यक्रमांना तुफान गर्दी लोटत असते. तिकिटांचे रेट सर्वसामान्य श्रमिक कामगारांना परवडतील असेच असतात. या कार्यक्रमांना स्थलांतरित उत्तर भारतीय श्रमिक वर्ग हजेरी लावतात. या श्रमिकांच्या सिनेमाच्या अंतरंगात डोकावताना दिसलेले अनेक पैलू… ************************************************************************************************************* भोजपुरी चित्रपटसृष्टी पूर्व उत्तर प्रदेश, पश्‍चिम बिहार आणि दक्षिण नेपाळ या भौगोलिक प्रदेशांत भोजपुरी भाषा बोलली जाते. त्याशिवाय भोजपुरी भाषिक […]

मृगजळ

लक्ष्मीकांत देशमुख त्या मध्यरात्री त्यांच्या घरात चार बुरखा घातलेले नक्षली शिरले होते. एकानं मोठ्यानं ‘चंद्राण्णा’ अशी हाक मारत लाथेनं दोघांच्या अंगावरचं पांघरूण काढलं व टॉर्चचा प्रकाशझोत टाकीत तो चंद्राण्णाच असल्याची खात्री करून घेत त्याच्यावर रायफलनं चार गोळ्या घातल्या. त्याच्या मर्मांतक विव्हळण्यानं व सुखदाईच्या ओरडण्यानं खुशी जागी झाली व तिनं भोकाड पसरलं. तिच्या तोंडावर हात ठेवीत तिला सुखदाईनं गप्प करत छातीशी धरलं… ************************************************************************************************************* ‘पोलिस अधिकार्‍याचा खून करून सुखदाईचं जंगलात पलायन. मांगी या नक्षली दलममध्ये पुन्हा सामील – सूत्रांची माहिती.’ दंडकारण्यातील घनदाट […]

त्या दोघी आणि त्यांचे वडील

डॉ. सुबोध नाईक ह्या कथेमधले विज्ञानतज्ज्ञ वडील आपल्याला भेटतात ते दररोज आपल्या स्वयंपाकघरात आणि विज्ञान, कला, संशोधन, संस्कृती अशा बर्‍याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ अशा ह्या दोन मुलींच्या आयुष्याचे शिल्पकार म्हणून! आणि ह्या दोन मुलीही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात तर भेटतातच. पण, आपल्या जीवनाच्या बाकीच्या बर्‍याचशा महत्त्वाच्या अंगांमध्येही! ‘मी करत असलेल्या कोणत्याही गोष्टीने भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता त्याचा फायदाच होतो आहे ना,’ असा प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक क्षणाला विचार करणार्‍या ह्या दोन मुलींची आणि त्यांच्या तशाच तेजस्वी वडिलांची ही ओळख. ************************************************************************************************************ […]

वसंतदादा पाटील : लोकोत्तर लोकनेता

दिनकर रायकर इतका मोठा माणूस, पण राहणी अतिशय साधी. ब्रॅण्डेड कपडे, गाड्या, दागिने याच्या आहारी गेलेल्या राजकारण्यांपेक्षा एकदम वेगळं व्यक्तिमत्त्व! सत्तेची खुर्ची असतानाही दादांमधला सहृदय माणूस कायम जागा होता. त्यांचा पिंड जुन्या पठडीतल्या माणसांसारखा. स्वत:च्या हिमतीवर, स्वकर्तृत्वावर त्यांची राजकीय कारकिर्द घडली. दादांना कधी ‘गॉडफादर’ची गरज भासली नाही. दादांचा सर्वांत मोठा गुण असा की, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचं दडपण जनसामान्यांवर कधीही येऊ दिलं नाही. ************************************************************************************************************ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काया-वाचा-मनाने झोकून देणार्‍या आणि कालांतराने भारत स्वतंत्र होण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर नव्या भारताच्या जडणघडणीला […]

तांडव

अनंत खासबारदार बाहेरच्या सृष्टीचाच धीर जणू सुटला होता. धीरानं-नेटानं आजवर उभी राहिलेली झाडं… या तांडवात कस्पटासारखी! उन्मळून-विखरून… विचित्र आवाजात तुटणारे त्यांचे बुंधे… त्यांचा आवाज त्यातच विरून जाणारे आणि चित्कार, पक्षांचे त्यानं गिळलेल्या सगळ्यांच्याच घुसमटीचे, तडफडीचे आवाज. आणि एक कुंद वास पसरून राहिलेला… ************************************************************************************************************* शिवलीलामृताची पोथी कपाटात ठेवून माई वळाली…. मघाशीच दिवा अचानक शांत झाला होता. पोथीतल्या टाईपवरून नजर फिरतानाच, मघाशीच त्यांना मंद वाटलं. ते त्यामुळचं! वर्षानुवर्षे पाठ असणारं शिवलीलामृत! पण समोर जीर्ण पानं असली की सवयीला दिलेला तो एक नमस्कारच […]