Warning: curl_exec() has been disabled for security reasons in E:\HostingSpaces\abab42631\choufer.com\wwwroot\2016\wp-includes\Requests\Transport\cURL.php on line 162
जी. एं. चा शकुन

जी. एं. चा शकुन

राजू परुळेकर

व्यक्तिगत आयुष्यात जी.ए. कुलकर्णी हे महान लेखक असले तरी ते एखाद्या बंद कुलपासारखे होते. जी.ए. हे जेवढ गूढ लिहित असत ते तेवढच स्वत: गूढ जगतअसत. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आपल्याला स्तिमित करून सोडतात.
*************************************************************************************************************

युधिष्ठीर एवढा मृदुहोता कि दुर्योधनाला तो सुयोधन म्हणत असे. आजच्या काळात जर तो असता तरत्याने इरवाळपींेप ला इरवाळपींेप म्हंटले असते, अशा काहीशा वाक्यांची संततधार आणि त्यातून निर्माण होणारा, तत्वज्ञान सांगणारा, अभिजात विनोद, जी. ए. कुलकर्णींच्या माणसे अरभाट आणि चिल्लर ह्या पुस्तकात मी जेव्हा वाचला तेव्हा मला मराठीमध्ये फक्त कोटीबाज विनोदच होतात असे नाही ह्याचं खरं समाधान मला लाभलं.
जी. एं. नी आयुष्यावर गारुड केल्याचा एक मोठा काळ त्यांच्या चाहत्यांच्या आयुष्यात येतोच.

22-1
सांजशकुन, काजळमाया, रमलखुणा, हिरवे रावे, रक्तचन्दन, कुसुमगुंजा, इस्किलार ह्या आणि अशा इतर पुस्तकातून जी. एं. नी मलानियती, आयुष्यातील अपरिहार्यता, जगण्यातली निरर्थकता आणि तत्वज्ञाचा विराटपणा ह्याचं भान त्यांच्या लेखनातून दिलं.
व्यक्तिगत आयुष्यात जी.ए. कुलकर्णी हे महान लेखक असले तरी ते एखाद्या बंद कुलपासारखे होते.त्यावर स्वतंत्रपणे वाचण्यासारखं एक गोड पुस्तक जी. एं च्या मठाच्याआतपर्यंत पोहचू शकणार्‍या, फार थोड्यांपैकी एक असलेल्या चित्रकार सुभाष अवचट ह्यांनी लिहिलेलं आहे. जी.ए. हे जेवढ गूढ लिहित असत ते तेवढच स्वत: गूढ जगतअसत. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आपल्याला स्तिमित करून सोडतात.
ते एखाद्या अंधार्‍या गुहेतून थोडे, थोडे समजत आहेत अस वाटत राहतं. ते थोडंथोडं समजण हे शक्य झालं ते विदुषी सुनिता देशपांडे ह्यांच्याशी झालेलात्यांचा पत्रव्यवहार आणि सुभाष अवचट ह्यांनी लिहिलेले पुस्तक आणि आपल्यापर्यंत पोहचवलेली माहिती नि असंच आणखी काही खर तर वैयक्तिक आयुष्यात जी. ए. अतिशय साधे होते.
धारवाडमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यापलीकडे ते फक्त कला व लेखनप्रपंच करत असत. त्यांना चिकटू पाहणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या हाताला तेलागत नसत. त्यांना माणसांची घृणा आहे कि काय असं वाटावं इतके ते एकलकोंडे, एकांतप्रिय आणि गूढ जगत असत.
त्यांच्या जीवनाचा त्यांच्या लेखनावर खोल ठसा उमटलेला कायम जाणवत राहतो. पाश्‍चात्य व पौरात्यतत्वज्ञान, इंग्रजी भाषा, चित्रकला, अंतरराष्ट्रीय वाङ्मय आणि ह्या सार्‍यापलीकडे असलेली आयुष्याची निरर्थकता ह्या सार्‍यात त्यांनी अटलांटिक समुद्राच्या तळाएवढी खोली गाठली होती.
सुनिताबाईंना त्यांनी लिहिलेली पत्र ज्या ओघवत्या शैलीमध्ये ते लिहितात आणि ज्या सहजपणे वैश्‍विक साहित्य, शास्त्र, कला, तत्वज्ञान आणि अभिजातपणा ह्याचा ओघवता प्रवाह मांडतात ते आपल्याला थक्क करून सोडतं.
काजळमाया ह्या त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्यांनी स्वत: केलेलं पेंटिंग होत. पण हेखरं कि खोट ह्याचं गूढ त्यांनी कायम ठेवलं.
नोबेल पारितोषिक विजेता विल्यम गोल्डिंग ह्याचं पुस्तक ’ङेीव ेष ींहश षश्रळशी’ ह्या नोबेल विजेत्या पुस्तकांचं मराठी भाषांतर जी.ए कुलकर्णी ह्यांनी केलंय.
त्याच्या प्रकाशनाला खुद्द विल्यम गोल्डिंग उपस्थित होते, पण जी. ए. मात्र उपस्थित राहिले नाहीत.
जणू काही भाषांतर झाल्यानंतर त्यांचं काम लेखक आणि माणूस म्हणून संपल अस त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची आनंददायी घटना, त्यांनी त्यांच्या त्या पुरस्कारबद्दल, हल्ली फेसबुक वर येतात तशाच एका अडाणी, नकारात्मक प्रतिक्रियेमुळे तत्काळ पुरस्कार परत करून साजरी केली. अशा एक ना अनेक गोष्टी!
पण एक हळवे जी.ए. पण होते. त्यांची बहीण नंदाताई आणि भाच्या ह्यांच्यावर त्यांचा अपार जीव होता. हा हळवा कोपरा त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानांमधून हळूच डोकावतो. पूर्वआयुष्यातल्या अनुभवांनी माणूस एवढा झपाटून जातो, आयुष्याचा तळ शोधून काढतो आणि समृद्धपणे हे लिहून ठेवतो जे आपोआप नंतर वाचकांपर्यंत पोहचत. हे एका महालेखकाचं उदाहरण आहे. कदाचित अर्नेस्ट हेमिंग्वे सारखं पोरसवद्या वयात म्हणजे शाळेत असताना मी जी.ए. यांचा सांजशकुन हा कथासंग्रह प्रथम वाचला आणि मग झपाटून गेलो.
मग जी.ए. नि जे जे लिहिलं ते वाचत गेलो. त्यांचा इस्किलार वाचताना इस्किलार अल सेरिपी एली हा मंत्र म्हंटल्यावर जी.ए प्रगट होतात असे बरेच काळ मला वाटत राह्यचं. आयुष्य ही एक संधी नसून आपला जन्म हे एक आपल्यावर केलेलं कोणीतरी चेटूक आहे हे रमलखुणा वाचल्यावर मला वाटत राहिलं. किंबहुना आजही मला तेच वाटत.

22-2
माझ्या आयुष्यात एक काळ असा आला कि जी.ए. यांच्या अनेक कथा वाचून वाचून मला मुखोद्गत झाल्या.जी.एं च्या ख़ास अस्तित्ववादी शैलीत मी न्ह्याऊन निघालो.
त्या काळात मला पोचनव्हती, आत्मविश्‍वास नव्हता, मला जी.एं पर्यंत प्रत्यक्ष पोहचून भेटण्याचा मार्ग माहीत नव्हता आणि माझं वयही नव्हत.
मला असं वाटायचं कि जी.एं. सारखं लिहिता आलं पाहिजे.
मला माझा मी सापडत नव्हतो तेव्हा जी.एं. नी आपल्या लेखनाच्या निर्विकार आणि निर्विकल्प समाधीमध्ये मला खेचून घेतलं, यथेच्छ बुडवलं.
मराठीतल्या अनेक महालेखकांना आणि महाकवींना त्यांनी आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये लेखन केलं असततर त्यांना सर्व आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पारितोषिकं प्राप्त झाली असती. अशांमध्ये जी. ए. कुलकर्णी ह्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
जी.ए. कुलकर्णी किंवा ह्यांच्या ताकदीचे लेखक किंवा ग्रेस ह्यांच्या सारखे कवी ह्यांचे इंग्रजी भाषेवर असाधारण प्रभुत्व होते तरीही आईच्या दुधाला जागून त्यांनी मराठीत लिहिलं.
आणि आपणा सर्वाना त्यांनी उपकाराच्या ओझ्याखाली ठेवलं!
जी.ए. अखेरच्या आजारपणामध्ये सुद्धा कुणालाही न कळवता इस्पितळात दाखल झाले.
अर्थात सुनिताबाई आणि पु.ल. देशपांडे ह्यांना ह्याचा पत्ता लागला आणि त्यांनी त्यांच्या नात्यातली स्नेह आणि प्रेम वापरण्याचा प्रयत्न केला पणत्याही वेळी जी. एं. नी आपला संकोच व स्वत:बद्दलची आलिप्तता कायमच ठेवली.
अखेर जी.ए गेले.
ज्या दिवशी जी.ए गेले त्या दिवशी मी त्यांच्या पुस्तकातील पाठ असलेली पानं स्वत:शीच म्हणत राहिलो.
ॠीर्रींशूरीव मध्ये र्ऋीपशीरश्र साठी आलेल्या झीळशीीं सारखा!
नंतर मला अनेकदा अस वाटायचं कि आपण इस्किलार अल सेरेपी एली म्हणावं आणि जी.ए. प्रगट होतील.
पण तसं काही झालं नाही. तस काही होत नाही हीच नियती असते असंच तर जी.ए. नी लिहून ठेवलं होतं न
पण नियतीचा योगायोग म्हणजे मध्ये लेखक विलास साळुंखे यानी जी.ए कुलकर्णी ह्याचं इस्किलार आणि इतर कथांच ’अ र्गेीीपशू ऋेीर्शींशी’ ह्या नावाने अप्रतिम भाषांतर केलं.

22-3
प्रकाशकांनी जुषेीव मधील त्या पुस्तक प्रकाशन समारंभात र्ॠीशीीं ेष हेर्पेीी म्हणून पुस्तक प्रकाशनकरण्यासाठी आणि इस्किलार आणि इतर कथांवर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं. हा निव्वळ व निव्वळ योगायोग होता जी. एं. च्या इस्किलारच्या इंग्रजी प्रकाशनाच्या वेळी जुषेीव मध्ये बोलताना माझ्या मनात राहून राहून एकच वाटत होत,
अरेच्च्या जी.ए नवसाला पावतात की!
जी. एं च्या सांजशकुन ह्या कथा संग्रहात समुद्र नावाची कथा आहे. त्यातील शेवटची ओळ माझ्या बाबतीत घडून आली.
समुद्र आता शांत आहे!
जी.ए. ना माझं खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाचा केक.

*************************************************************************************************************

राजू परुळेकर
वेदवाङ्मय, इतिहास, राजकारण, विज्ञान आणि समकालीन वास्तवाचा सतत वेध घेणारा लेखक, स्तंभलेखक. ई टीव्ही वाहिनीवर ‘संवाद’ नामवंतांच्या मुलाखतीचा कार्यक्रम विशेष लोकप्रिय.
Email: rajuparulekar1@gmail.com
Mob: 98201 24419

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *